Enquiry Now

सुपर्ण

४९१ नं. ५०+२+५३ प्लॉट नं.६२ पर्वती, अरण्येश्वर चौक, 'ऋतुरंग' इमारतीशेजारी, एच.डी.एफ.सी. शेजारी, पुणे ४११००९.
फोन नं ०२०-७९६२२६५२/९८२३०३२९३१.

केटरींग व्यवस्थापन , जोशी-गोखले म्हणजेच... त्रिविक्रम उद्योग

साखरपुडा, बारसे, वाढदिवस, स्वागत समारंभ, अशा लहान समारंभासाठी

ई-मेल : joshigokhalecat63@gmail.com | ऑफिसची वेळ : स. 10.30 ते दु.1.00 व सायं. 5.30 ते रा. 8.00
चार (४) तासांचे भाडे (जी.एस.टी. सह)

राजहंस सभागृह - ३ रा मजला
बुकिंग रक्कम १५,००० /- Non AC
बुकिंग रक्कम २३,००० /- With AC

सुपर्ण हॉल डायनिंगसह २ रा मजला
बुकिंग रक्कम २५,०००/- Non AC
बुकिंग रक्कम ३३,०००/- With AC

- ५ महिने आधी बुकिंग करता येते.
- बुकिंग रक्कम भरून पावती केल्यानंतर बुकिंग नक्की होते.
- ए.सी. सुविधा प्रति तास ₹ २,०००/. ए.सी. साठी जनरेटर बॅक-अप नाही.
- बॅक अप सह लिफ्ट सुविधा उपलब्ध.

भोजन मेनू
मीठ, लिंबू लोणचे, पुरी व आपण निवडलेले एक स्वीट (सर्व अमर्याद)

आमच्या व्यवसायाला आवश्यक कोणत्याच वस्तूंचे भाव स्थिर नसल्यामुळे, भाव कायम वाढतच असल्यामुळे आमचे दर नक्की करणे अवघड जात आहे. गुणवत्तेत तडजोड करायची नाही, हे नक्की आहे. त्यामूळेच आपल्याला दिलेले दरपत्रक बदलू शकते, कार्याचे दिवशीचे दर पत्र कार्याचे वेळी धरले जाते, याची कृपया नोंद घ्यावी.


पॅकेज

रांगोळी
₹ १५००/-

फोटो व व्हिडिओसाठी सर्व नियम व अटी पाळून आपण आपल्या आवडीने नियोजन करू शकता. परंतु इव्हेंट मॅनेजमेंट, बलून्स डेकोरेशन, फुलांचे (ताजे वा आर्टिफिशियल) डेकोरेशन हे आपणांस खाली दिलेल्या एजन्सीज् कडूनच करुन घेणे बंधनकारक आहे. बाहेरील एजन्सीजना त्याची परवानगी नाही. त्याबाबतीत कृपया सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

1. बुकिंग रद्द करणे : लहान कार्याचे बुकिंग रद्द करण्याचे नक्की झाल्यावर त्वरित बुकिंग रद्द करणे बाबतचा अर्ज मूळ पावती सह आमचेकडे द्यावा. हे बुकिंग अन्य कोणी बुक केले अथवा बुकिंग तारीख मोकळी राहिली तरी देखील राजहंस ७,५०० रुपये / सुपर्ण १२,५०० रुपये (Cancellation Charges ) कापून उर्वरित रक्कम १ महिन्याने मिळेल.

2. बुकिंग बदलणे : लहान कार्याचे बुकिंग बदलण्यासाठी (उपलब्धतेनुसार) किमान राजहंस ५,००० रुपये / सुपर्ण १०,००० रुपये वेगळे द्यावे लागतील.

3. लहान समारंभाचे बुकिंग पाच ५ महिने आधी करता येते. सभागृह भाड्याची पूर्ण रक्कम भरून पावती केल्यानंतर बुकिंग नक्की होते.

4. दोन्ही सभागृहांना जनरेटर बॅकअप सह लिफ्ट सुविधा उपलब्ध आहे. ए सी साठी जनरेटर बॅकअप नाही.

5. होणाऱ्या बिलाची पूर्ण रक्कम कार्यक्रमापूर्वी दहा दिवस आधी जमा करणे बंधनकारक आहे. तसेच ऑर्डर दिलेल्या संख्येएवढी किमान आकारणी (मिनिमम चार्जेबल फिगर) द्यावी लागते. ऑर्डर लेखी किंवा तोंडी असली तरीही.

6. आरक्षण करणाऱ्या एका जबाबदार व्यक्तीने आमच्याशी संपर्कात रहावे. इतरांनी त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची ढवळाढवळ करू नये. मसलत करू नये. त्याची आम्हाला कोणतीही दखल घेता येणार नाही.

7. कॉन्ट्रॅक्टचे व जादा गोष्टींचे दर सध्याच्या बाजारभावानुसार ठरतात. त्या परिस्थितीनुसार कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापनेने आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत.

8. अति महत्त्वाच्या सर्व सूचना व व्यवस्थापनाचे निरोप कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करून सांगणे आवश्यक आहे. कृपया व्हाट्सअप करू नये ही नम्र विनंती.

9. सरकारी नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

10. वरील सर्व नियमांमध्ये बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापनाने आपल्याकडे राखून ठेवला आहे. कायदेशीर वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयीन कक्षेत सोडविला जाईल.