Enquiry Now

काकडे पॅलेस (ए.सी.)

प्लॉट नं. 89, 90, 91 वडाचा बसस्टॉप, हिंगणे बुद्रुक , कर्वेनगर, पुणे 52. फोन: 02025474490

केटरींग व्यवस्थापन , जोशी-गोखले म्हणजेच... त्रिविक्रम उद्योग

विवाह समारंभ पॅकेज ₹ 5,00,000/-   रुपये पाच लाख फक्त बुकिंग रक्कम ₹ 2,00,000/-

हृषिकेश जोशी : 7875478008 | मकरंद गोखले : 9890114495 | ई-मेल : kakadepalace@joshigokhalecaterers.com | ऑफिसची वेळ : स. 10.30 ते दु.1.00 व सायं. 5.30 ते रा. 8.00

04. पेढा 6 किलो वजनी पेढा (अंदाजे 400 नग )
₹ 6,000/-

आयटम नं. 3 ते 8 आपण पुर्वसूचनेने ऑर्डर देऊन वाढवू शकता. (त्यानुसार बील आकारले जाईल.)

पॅकेजमधील दुपारचा मेनू


पॅकेजमधील रात्रीचा मेनू

आमच्या व्यवसायाला आवश्यक कोणत्याच वस्तूंचे भाव स्थिर नसल्यामुळे, भाव कायम वाढतच असल्यामुळे आमचे दर नक्की करणे अवघड जात आहे. गुणवत्तेत  तडजोड करायची नाही, हे नक्की आहे. त्यामूळेच आपल्याला दिलेले दरपत्रक बदलू शकते, कार्याचे दिवशीचे दर पत्र कार्याचे वेळी धरले जाते, याची कृपया नोंद घ्यावी.


1. बुकिंगच्या वेळी ₹ २,00,000/- ऑनलाईन/चेकने भरावे. उर्वरीत रक्कम ऑनलाइन/चेकने 20 दिवस आधी देणे.

2. बुकिंग रद्द करणे : विवाह / व्रतबंध अशा मोठ्या कार्याचे बुकिंग रद्द करण्याचे नक्की झाल्यावर त्वरित बुकिंग रद्द करणे बाबतचा अर्ज मूळ पावती सह आमचेकडे द्यावा. हे बुकिंग अन्य कोणी बुक केले अथवा बुकिंग तारीख मोकळी राहिली तरी देखील ₹ 1,00,000/- (Cancellation Charges) कापून उर्वरित रक्कम 1 महिन्याने मिळेल.

3. बुकिंगमधे बदल : विवाह / व्रतबंध अशा मोठ्या कार्याचे बुकिंग बदलण्यासाठी (उपलब्धतेनुसार) किमान ₹ 25,000/- वेगळे द्यावे लागतील.

4. जादा खर्च (मेनू बदल, डेकोरेशन, फोटो, व्हिडिओ स्वागत पेय, दुपारचा चहा, जादा खुर्ची इत्यादी.)
जादा रूम भाडे : प्रति रूम ₹ 2,000/-, जादा गादी सेट प्रति गादी सेट ₹ 200/-, रुम करीता लागणारी कुलपे स्वतःची आणावीत.

5. कृत्रिम फुलांचे अथवा ताज्या फुलांचे डेकोरेशन हे व्यवस्थापनाने निश्चित केलेल्या एजन्सीकडूनच जादा आकार देऊन करावे लागते, याची नोंद घ्यावी. बाहेरील एजन्सी कडून फुलांची सजावट करुन घेता येणार नाही. तसेच बाहेरील इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिससाठी व्यवस्थापनास परवानगी देता येणार नाही.

6. सभागृहातील ए.सी.ची वेळ : आदल्यादिवशी सायं. ७ ते ९ व विवाहाचे दिवशी स. ८ ते दु. ३ पर्यंत

7. सभागृहाच्या आवारात व समोरील रस्त्यावर बँड, तुतारी , फटाके यांना पूर्णपणे बंदी आहे.

8. विवाहाच्या आदल्या दिवशी संगीत कार्यक्रम रात्री 9.00 पर्यंत करता येईल. रात्रीची भोजन व्यवस्था 10.00 पर्यंत असते याची नोंद घ्यावी.

9. सरकारी नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.